मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती नगर मधील कापसाच्या मिल शेजारी सरोवर एक अज्ञात इसम गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. सदर इसमास पोलिसांनी सरकारी दवाखाना येथे भरती केले असता काही वेळाने या इसमाचा मृत्यू झाला होता. याबाबत हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेतील मयताची ओळख पटली नव्हती मयताची ओळख निष्पन्न करून आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. 2 ऑगस्ट रोजी या गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस ठाणे यांच्याकडून अटक करण्यात आली, मात्र गुन्ह्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
सदरील गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मयताची ओळख पटविण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस अधीक्षक येथील देशमुख यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा व हिंगोली शहर पोलिस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास सुरू केला. नमूद घटनाही खुनाची असल्याबाबत पुरावे असल्याने त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. याबाबत पोलिसांनी मयताचे छायाचित्र सर्वत्र प्रसारित करून तसेच गोपनीय बातमीदार यांच्या माध्यमातून काही वेळातच नमूद मयत इसमाची ओळख निष्पन्न केली. मयताचे नाव रोहिदास विठ्ठल पोटे (वय 30 वर्ष रा. पांगरा शिंदे ता. वसमत जि. हिंगोली) असे असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकास गोपनीय माहिती घराकडून माहिती मिळाल्यावरून नमूद खुनात सहभागी आरोपी हे मोटारसायकलने कळमनुरी इकडे पळून जात असल्याची माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे दोन तपास पथकाने तंत्रशुद्ध तपास पद्धतीचा वापर करून 1 ऑगस्ट रोजी लाल रंगाची मोटरसायकल हिरो होंडा कंपनीची जिचा पासिंग क्रमांक (एम एच 38 ए 77 असा आहे) त्या मोटरसायकल सह आरोपी प्रवीण रत्नाकर जाधव (वय 21 वर्षे व्यवसाय मजुरी रा. मल्हारवाडी जवळा पळशी रोड हिंगोली) राहुल प्रवीण कांबळे (वय 19 वर्षे व्यवसाय मजुरी रा. ज्योती नगर जिजामाता नगर च्या बाजूला हिंगोली) व एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. नमूद आरोपीस विचारपूस करून तपास करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील आरोपी प्रवीण जाधव व राहुल कांबळे यांना पुण्याचे तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अनिल काच मांडे यांनी अटक करून गुन्ह्यात आरोपींनी वापरलेले मोटरसायकल व मोबाईल जप्त केला आहे. आरोपींना अटक केली असली तरी बोलण्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
ही कारवाई हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सुनील गोपीनवार, अनिल काचकांडे, पोलीस उपनिरीक्षक जिव्हारे, सुरेश भोसले, पोलीस अंमलदार शेख शकील, भगवान आडे, शंकर ठोंबरे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर साबळे, किशोर सावंत, शेख जावेद, तुषार ठाकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा तसेच हिंगोली शहर पोलीस ठाणे येथील अंमलदार शेषराव पोले, शेख मुजीब, सतीश जाधव गणेश लेकुळे दिलीप बांगर नरेंद्र सावळे अस्लम गारवे यांनी केली.
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस ठाणे यांनी गुन्ह्यातील मयत व आरोपी अज्ञात असताना जलद गतीने उत्कृष्ट पणे तपास करून गुन्ह्यातील मयताची ओळख निष्पन्न व आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केल्याने हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सर्व तपास पथकाचे अभिनंदन केले.