हिंगोली : संतोष अवचार
जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र श्री संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी हिंगोली येथून नरसी नामदेव येथे जाणारा ऑटो 24 जून रोजी च्या रात्री उलटला. या अपघातात एक महिला जखमी झाले असून या महिलेवर हिंगोली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही घटना देऊळगाव रामा पाटीजवळ घडली.
हिंगोली येथून नरसी नामदेव येथील संत श्रेष्ठ संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी जात असताना MH38-3020 हा ऑटो देऊळगाव रामा पाटीजवळ चालकाचा ऑटो वरील ताबा सुटल्याने हा ऑटो रोडच्या खाली उतरला व पलटी झाला. ऑटोमध्ये चार ते पाच प्रवासी प्रवास करत होते त्यातील एका महिलेचे किरकोळ मार लागला असून या महिलेला हिंगोली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे महिलेवर उपचार सुरू असून ऑटोचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.