मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – शहरास पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन कधीही फुटु लागली असून दुरुस्तीच्या कामात चार – चार, पाच – पाच दिवस लागत आहेत. आधीच पाच ते सहा दिवसात हिंगोली करांना नगरपालिकेकडून पाणी पुरवठा केला जात असून त्यात पाणीपुरवठ्याची लाईन अशी केव्हाही खराब होऊ लागल्याने नागरिकांना 10 – 10 ते 13 – 13 दिवस पाणी मिळत नाही. परिणामी भर उन्हाळ्यात हिंगोलीकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासकीय राज असल्याने संबंधित अधिकारीही दुर्लक्ष करत आहेत.
सध्या उन्हाळा सुरू असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण गर्मी सह उन्हाच्या चटक्यांचा सामना करावा लागत आहे. उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून नागरिक थंड पेयासह विविध फळे आपल्या आहारात घेऊ लागली आहेत.
उन्हामुळे शरीरास पाण्याची गरज वाढू लागली असून उष्माघातापासून बचाव करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यकता खबरदारी घेण्याबाबत सूचना व आवाहन केले जात आहे. त्यातच या भीषण उन्हाच्या पाऱ्यात नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याचे वेळोवेळी तीन तेरा होत आहेत.
कित्येकदा हिंगोली शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनची दुरुस्ती वा ती फुटू लागली आहे. परिणामी हिंगोली नगर परिषदे कडून आधीच नागरिकांना पाच – पाच ते सहा – सहा दिवसात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात आता पाणीपुरवठा लाईनच्या दुरुस्तीमुळे आणखी काही दिवसांची भर पडू लागली आहे.
परिणामी हिंगोली करांना दहा – दहा ते तेरा – तेरा दिवस भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून खाजगी टँकरद्वारे पैसे देऊन पाणी खरेदी करावे लागत आहे. हे टँकरही पाण्याचे आवाजाच्या संवर्धन आकारत असून भीषण पाणी टंचाईच्या सामन्यासह नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
हा भुर्दंड टाळण्यासाठी शहरातील अनेक महिला व बालके हंडा घेऊन भरून नाद पाण्याचा शोध घेण्यासाठी वन – वन भटकंती करत आहेत. या सर्व प्रकाराकडे हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांसह प्रशासनास काही वाटते की नाही, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.
या सर्व प्रकरणाकडे संबंधितांनी लक्ष देऊन तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा करून वेळोवेळी नादुरुस्त होणाऱ्या पाईपलाईन कडे लक्ष देऊन ते नादुरुस्त होणार नाही याबाबत काळजी घ्यावी, असेही बोलले जात आहे.