मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच DAPCC,DCC व EMTCT आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, ART MO डॉ. कोठुळे, DPM शंकर तावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, महिला व बालकल्याण अधिकारी मगर, जिल्हा कामगार अधिकारी, नायब तहसीलदार जोशी, विहाणच्या अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी, डापकुचे आशिष पाटील, संजय पवार, टिना कुंदणानी इत्यादी हजर होते.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील HIV/AIDS कार्यक्रमाचा मागील वर्षातील आढावा सादर केला.
मागील वर्षी एकूण जनरल तपासणी 42 हजार 50 केली व यामध्ये एकूण Positive-101, तसेच या सर्वाँना ART उपचार सुरू करण्यात आले.
गरोदर मातांची तपासणी एकूण-35832 झाली असून एकूण नवीन Positive -9 आहेत, या सर्वांना ART उपचार सुरू करण्यात आले आहेत.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकूण जनरल Positive-4067 व गरोदर माता Positive -271 आहेत. तसेच एकूण 1867 रुग्णांना ART उपचार सुरू आहेत. यावर माननीय जिल्हाधिकारी यांनी DAPCU च्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
तसेच PLHIV व FSW यांचे सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रलंबित प्रकरणे जुलै महिन्याच्या अखेरीस निकाली काढण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.