Marmik
Hingoli live

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना; बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

हिंगोली : संतोष अवचार  

प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी  करण्यासाठी  विशेष जनजागृती मोहिम राबवून दि. 31 मे, 2022  पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना होत्या. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.

सद्यस्थितीत दि. 2 जून, 2022 अखेर राज्यातील आधार प्रमाणित 106.68 लाख लाभार्थ्यांपैकी 57.33 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित 49.14 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित आहे. त्यामुळे आता दि. 31 जुलै, 2022 अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.  प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित वेळेत ई-केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

Related posts

सेनगाव तालुका कृषी असोसिएशनचे आंदोलन; प्रस्तावित कृषी निविष्ठा कायदे रद्द करण्याची मागणी

Gajanan Jogdand

संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर रंगला एकता चषक क्रिकेट सामना

Santosh Awchar

पूर्णा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडा ; कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश          

Gajanan Jogdand

Leave a Comment