मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील ताकतोडा येथे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रगण्य नेते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील 18 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सातासमुद्रापार म्हणणारे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रगण्य नेते गोरगरिबांचे कैवारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील प्रमोद वैरागड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच धोंडजी मानमोठे व मानवरहित लोकशाही पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेवराव मानमोठे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास लक्ष्मण मानमोठे, चंद्रकांत मानमोठे, दिनकर लांडगे, नारायण वैरागड, सुरेश रसूले, किशोर मानमोठे, पवन मानमोठे, सचिन वैरागड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.