Marmik
सिनेमा

९ फेब्रुवारीला होणार एंटरटेनमेंटची डिलिव्हरी ‘डिलिव्हरी बॉय’!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – लवकरच चित्रपटगृहात मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टर, टिझर आणि ट्रेलरने या चित्रपटाची उत्सुकता प्रचंड वाढवली असून येत्या ९ फेब्रुवारी रोजी ही एंटरटेनमेंटची डिलिव्हरी होणार आहे.

लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस निर्मित, सिनेपोलिस सिनेमा प्रस्तुत, या चित्रपटाच्या दीपा नायक प्रस्तुतकर्त्या आहेत तर डेव्हिड नादर निर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी चित्रपटाचे लेखन केले असून यात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सरोगसी सारख्या एका नाजूक विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. विषय जरी नाजूक असला तरी त्याचे गांभीर्य जाऊ न देता अतिशय मनोरंजनात्मकरित्या या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना ‘सरोगसी’साठी तयार करताना दिसत आहेत आणि यातून होणारा कल्लोळ आपल्याला चित्रपटात दिसणार आहे.

आता हे दोघे गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करणार का, त्यांच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होणार, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. चित्रपटातील ‘भाऊचा नादखुळा’ आणि ‘तू आई होणार’ ही दोन गाणीही प्रचंड लोकप्रिय होत आहेत.

एकंदरच मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना ‘डिलिव्हरी बॉय’च्या निमित्ताने मिळणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, “हलक्या फुलक्या पद्धतीने सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे. चित्रपट विनोदी जरी असला तरी या नाजूक विषयांचे गांभीर्य आम्ही तितकेच जपले आहे.

‘डिलिव्हरी बॉय’चे सादरीकरण वेगळे आहे आणि माझ्या मते हीच या चित्रपटाची खासियत आहे. चित्रपटाची कथा तुम्हाला कधी पोट धरून हसवेल तर कधी तुमचे मन हळवे करेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत एकत्र पाहावा.”

Related posts

“अप्सरा” चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च; प्रेम, सुमधुर संगीत, राजकारण, अॅक्शनची मेजवानी

Gajanan Jogdand

रोमँटिक-ऍक्शन लव्हस्टोरी ”नाद’चे कडक मोशन पोस्टर प्रदर्शित, ११ ऑक्टोबरला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Gajanan Jogdand

‘नाद’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न, १८ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

Gajanan Jogdand

Leave a Comment