प्रसंगीक – बबन जिरवणकर
हिंगोली चा दसरा महोत्सव ऐतिहासिक असा आहे; मात्र जिल्ह्यातील काही भागात या दसऱ्या प्रमाणे जुना व प्राचीन असा दसरा महोत्सव साजरा केला जातो… सेनगाव तालुक्यातील गुगुळपिंपरी येथे विजयादशमीपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत निजाम काळापासून चालत आलेला दसरा महोत्सव साजरा केला जातो.. या महोत्सवाने अनेक कला जोपासल्या आहेत.. महोत्सवा दरम्यान सहा देवांची मिरवणूक काढली जाते ही सहा देवता नवसाला पावणारे आहेत, अशी आख्यायिका आहे….
सेनगाव तालुक्यातील गुगुळपिंप्री येथे विजयादशमी पासून कोजागिरी पोर्णिमे पर्यंत सार्वजनिक दशहरा महोत्सवा अंतर्गत सहा देवाचा उत्सव प्रति वर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी उत्साहात साजरा होतो आहे. श्रीगणेशजी, श्रीशंकर भगवान, श्रीकृष्ण, भवानी माता, गरुड व श्रीहनुमान यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते या सर्व मुर्त्या लाकडी फ्रेमवर केळीची वाळलेली पाने लाकडी फ्रेमवर बरु तागा ने बांधून त्यावर भरजरीत वस्त्रे परिधान करून सुवर्ण आलकरांनी सजविण्यात येऊन त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत प्रामुख्याने अनेक ठिकाणची भारुड मंडळे आपली कला सादर करण्यासाठी हजेरी लावत आसतात.
कला सादर करण्याचे हक्काचे व्यासपीठ असल्याची भावना प्रत्येक मंडळांची असते.हा कार्यक्रम सबंध रात्र भर चालत आसल्याने प्रत्येक मंडळास संधी हमखास पणे उपलब्द होतेच. मिरवणुकी नंतर विधिवत पणे साही मूर्तीची स्थापना करण्यात येते.
दंडार हा भजनं प्रकार हद्दपार झाला असला तरी लळीत कार्यक्रमाअंतर्गत सोंगा – ढोगाच्या सादरीकरणातून गुगुळपिंप्री वासीयांनी हा प्रकार आजतागायत जिवंत ठेवला आहे. उत्सवा दरम्यान दर दिवशी नामांकित कीर्तनकार आपली कीर्तन रुपी सेवा सहा देवांच्या चरणी अर्पण करतात.
सर्व सना पेक्षा या सोहळ्याला येथे खूप महत्त्व आहे. लग्न झालेल्या मुली सह कुटूंब सामील होतात. त्यामुळे उत्सवा दरम्यान गावांतील सर्व घरे गजबजलेली आसतात. संपूर्ण गावात गोकुळ आवतरल्याचा भास निर्माण होतो.
सहा देवमधील गणपती हा संतान नसलेल्या जोडप्याला हमखास पणे पावतो अशी अनेकांची श्रध्दा आहे. नवसाला गणपती पावल्यावर गणपती समोरील दानपेटीत सोन्याचा किंवा चांदीचा गणपती अर्पण करण्याची प्रथा आहे.
गणपती किती जोडप्यांना पावला हा तर्क दनपेटीतून निगलेल्या गणपती मूर्तीवरून लावण्यात येतो. कोजागिरी पौर्णिमेला महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाल्या.
नर्तकी वंदना शेळके यांनी दीर्घ काळ आपली नर्तकी सेवा सहाही देवाच्या चरणी अर्पण केली आहे. आता त्यांनी वयोमानानुसार कार्यक्रम बंद केले असले तरी अधून – मधून सहादेवाच्या दर्शनासाठी येत असतात.
महाप्रसाद ने सांगता झाल्यानंतर स्थानिक कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. या कार्यक्रमात वंदना शेळके हया अनेक वेळा सहभागी झाल्या आहेत..
महोत्सवातील मूर्ती बांधण्यात निपुण असलेले शंकर आण्णा खोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन अंभोरे, संदीप शिंदे व इतर तरुणवर्ग परिश्रम करीत असतो. या दशहरा महोत्सवाला सुरुवात होण्या बाबत काहीही लिखित पुरावा उपलब्द नाही. याची सुरुवात आती प्राचीन काळापासून झाली असावी.
भाट लोकांच्या नोंदीनुसार गुगुळपिंप्रीवासीय दिल्लीच्या औरंगजेबाचे तक्त रक्षण करणा ऱ्यांच्या समूहामध्ये सामील होते. औरंजेबाच्या पतनानंतर उत्तर महाराष्ट्र मार्गे पैनगंगातीरी गुगुळपिंप्री येथे सहारा घेतला तो काळ निजामाच्या सुरुवातीचा होता.
हिंदु लोकाना हिंदू सण उत्सव साजरे करण्यावर बंधने होती; परंतू येथील लोक औरंगजेबाच्या रक्षण ताफ्यात सहभागी होते. या संदर्भाने त्यांनी निझामकडे साही देवाचा महोत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली ती निजामाने दिली. तेव्हा पासून हा महोत्सव साजरा करण्यात येतो असा तर्क लावण्यात येतो. याचा अर्थ हा दशहरा महोत्सव आती प्राचीन काळापासून साजरा करण्यात येतो.