Marmik
Hingoli live

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते झाले ध्वजारोहन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, राज्य राखीव दलाचे समादेशक संदिपसिंह गिल, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक  यशवंत काळे, अप्पर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी व सर्व उपस्थित मान्यवरांची भेट घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या . तसेच यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत तंबाखू विरोधी जनजागृती व तंबाखू विरोधी शपथ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांना दिली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते एकत्रित महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी व स्नेहल नर्सिंग होमचे डॉ. सत्यनारायण तापडीया यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. यात निबंध स्पर्धेमध्ये तिसरी ते पाचवीच्या गटातील श्रेया जाधव, आदेश पोले, ईश्वरी घुगे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इयत्ता सहावी ते आठवी गटात निबंध स्पर्धेमध्ये विद्या गरपाळ, श्रध्दा ढोले, नेहा सुर्यवंशी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इयत्ता नववी ते दहावी गटात निबंध स्पर्धेमध्ये प्रियंका हिराळे, तनवी राठोड, पूजा बगाटे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

इयत्ता 11 वी ते 12 वी गटात निबंध स्पर्धेमध्ये पायल जाधव, संध्या लोंढे, संध्या कावळे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गटामध्ये श्रेया जगताप, कृष्णा वारकड, श्रेयस धामणे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इयत्ता सहावी ते आठवीच्या गटामध्ये वैष्णवी शेवाळकर, सायली सोरते, विद्या डोल्हारे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

इयत्ता नववी ते दहावीच्या गटामध्ये ऋतुजा भोसले, पूजा सोळंके, स्नेहा नागरे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इयत्ता 11 वी ते 12 वीच्या गटामध्ये नरेंद्र खाकरे यांना प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related posts

काही महिन्यातच एनटीसीतील रस्त्यांना गेले तडे, सिमेंट रोडची कामे निकृष्ट!

Gajanan Jogdand

सेनगाव शहराला आले प्रति पंढरपूरचे स्वरूप! श्रींच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात आगमन

Gajanan Jogdand

पोलीस भरती आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ

Gajanan Jogdand

Leave a Comment