मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल व पलटण येथील रहिवाशीयाच्या वतीने हिंगोली चे आमदार तानाजी मुटकुळे यांना निवेदन देऊन पलटन हिंगोली येथील चौथ्या क्रमांकाच्या गल्लीतील रस्त्याचे बांधकाम अनेक वर्षापासुन रखडुन पडलेले आहेत. सदरील भागातील रस्ते तयार करण्याची मागणी केली असता आमदार मुटकुळे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून या भागातील रस्ते तयार करण्याबाबत अंदाजपत्रक तयार करण्याचे सांगितले. त्यामुळे सदरील भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
या बाबत अनेकवेळा निवेदन देऊन तसेच पाठपुरावा करुनही आजपर्यंत सदर रस्ता पुर्णपणे तयार करण्यात आलेला नाही.नगर परिषद हिंगोली व्दारे करण्यात आलेल्या रोडच्या कामामध्ये गल्लीतील अंतर्गत रस्ते न जोडता विविध ठिकाणी गॅप सोडण्यात आलेला असुन त्यामुळे रहिवाश्याना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.आपण हिंगोली मतदार संघाचे लोकप्रिय जनप्रतिनिधी असुन आपल्या कार्यकाळात अनेक कामे मार्गे लागलेली आहेत.
त्या दृष्टीकोनाने पलटन येथील नागरीकांच्या वतीने आपणास विनंती करण्यात आली की, आपण आपल्या निधीतुन पलटन हिंगोली येथील चौदंते घर ते शहाणे यांचे घर,अंतर्गत रस्ता सय्यद शौकत अली घर ते बाबु भाई यांचे घरापर्यंतचा रस्त्याचे दर्जेदार बांधकाम चांगल्या ठेकेदाराची नेमणुक करुन पुर्ण करण्याबाबत योग्य ती कारवाई करुन पलटन येथील रहिवाश्यांच्या अडचणी दुर कराव्यात अशी विनंती करण्यात आली.
निवेदन देताच आमदार तानाजी मुटकुळे यांनी मुख्याधिकारी व नगर अभियंता न.प.यांना लगेच मोबाईल द्वारे संपर्क करून सूचना दिले कि तात्काळ या रोड चे अंदाज पत्रक तयार करून शहरातील दुसऱ्या टप्प्याच्या रोड मध्ये शामिल कराव्यात हे रोडचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे अश्या सूचना दिले.
या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल सह,राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद,शेख नफीस पहेलवान,पवन जैस्वाल,अब्दुल अजीज,डॉ. मुन्तजीब खान, शोएब खान,अब्दुल मतीन,शेख मोईंज हाफीज,मो.रियाज बशीर,अदनान पहेलवान, माजीमोद्दीन आगा,सय्यद नईम,सऊद चाऊस,हाफिज रशीद, आदींच्या स्वाक्षरी असून सर्वांनी आमदार महोदयाचे आभार व्यक्त केले.