Marmik
Bhoomika महाराष्ट्र

पत्रकारितेतील हरवत चाललेली मूल्य

आरसा

माध्यम आणि पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. असे असले तरी पत्रकारांनी एकदा स्वतःच या आरशात पाहायला हवे असे वाटू लागले आहे. एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती पत्रकारितेत वाढलेली आहे. मूल्य, जबाबदारी आणि नैतिकता याच भान कुठे तरी हरवले आहे.

प्रसारमाध्यमांकडून सर्वसामान्य माणसाच्या खूप सार्‍या अपेक्षा असतात. मात्र त्या पूर्ण होताना दिसत नाही. दुसरीकडे पत्रकार आपला पत्रकारितेचा धर्म विसरल्याच दिसत आहे. जे काही घडलं त्याचा वृत्तांत सरळ साध्या शब्दात वाचकाना सांगणे अपेक्षित असताना पत्रकार तो आपल्या हितसंबंधांनुसार सांगत आहेत. बर्‍याचदा सत्य सांगण्याऐवजी दुसरेच वाचकांच्या माथी मारले जाते.

बौद्धिक चर्चेऐवजी मोबाईल आणि प्लॉटचीच चर्चा रंगत आहे. आसपास अनेक घडामोडी घडत असतात. पण त्याविषयी बातमीदारी करणार्‍यांना माहित नसतं. आपल्या बीटावर जाऊन माहिती घेऊन बातम्या न करता प्रेसनोट वरुन बातम्या केल्या जात आहेत. मग कुठून वेगळी बातमी मिळणार? वाचकांशी पत्रकाराने प्रामाणिक राहायला हवे. मात्र तसेही होत नाही.

हल्ली पत्रकार मंडळींची राजकीय पुढाऱ्यांशी निष्ठा वाढली आहे. तसेच त्याने निःपक्ष पत्रकारिता करणे आवश्यक असताना तो आता त्या त्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता झाल्या सारखा वार्तांकन करत आहे.अभ्यास करणे यांना कमीपणाचे वाटत आहे. त्यांना सर्वच रेडीमेड हवं आहे. मग कशाला तो? कशाला डोक्याला कटकट अशी स्थिती हल्ली माध्यम विश्वातील पत्रकाराची झाली आहे. मग कार्यालयातील मोठ्या पदावरील व्यक्तीशी स्वामीनिष्ठा दाखवून वेळ निभावून नेणे एवढं केलं तरी आपणही सुरक्षित आणि पाट्या टाकायला मोकळं अस चित्र निर्माण झालं आहे. मात्र हे सर्व आपल्या समाजासाठी घातक ठरत आहे. वाचक आपल्या अधिकारापासून वंचित राहत आहे.

अनेकदा पत्रकार मंडळी माहितीची शहानिशा न करता खोट्या बातम्या दिल्याच्या घटना घडल्या आहेत. जबाबदारीने आपण काम करायला हवे याचे भान हा सो कॉल्ड बुद्धिजीवी विसरत चालला का? असा प्रश्‍न पडतो. आपले सोर्स वाढवावेत. लोकांचे प्रश्‍न, त्याच्याशी कनेक्शन वाढवावेत यासाठी प्रयत्न होताना फारच क्वचित घडताना पाहायला मिळतात.

एखादी गुन्ह्यांची घटना घडल्यावर नंतर त्याचा तपास कुठपर्यंत आला? हे पाहिले जात नाही किंवा पाठपुरावाही केला जात नाही. असेच इतर घटनांबाबत घडताना दिसते.एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती पत्रकारितेत वाढलेली आहे. मूल्य, जबाबदारी आणि नैतिकता याच भान कुठे तरी हरवले आहे.

( सदरील लेख संभाजी नगर येथील प्रख्यात पत्रकार गणेश पिटेकर यांच्या ब्लॉगस्पॉट वरून घेण्यात आला आहे)

Related posts

सहाय्यक सरकारी अभियोक्ता लेखी परीक्षेत 20 मार्काचा प्रश्न आला आऊट ऑफ सिल्याबस! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तक्रार

Gajanan Jogdand

राणा श्वानाचे निधन; शोकाकुल वातावरणात पोलिसांकडून निरोप

Santosh Awchar

मी आणि माझं सरकार 24तास शेतकऱ्यांसोबत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना भावनिक साद; पत्र व्हायरल

Gajanan Jogdand

Leave a Comment