Marmik
News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-

लातूर –  महाराष्ट्र   लोकसेवा आयोगाकडून 2024 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे  आयोगाचे उपसचिव दे. वि. तावडे यांनी कळविले आहे.

शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत.

प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते.

सर्व संबंधित संस्थांनी  परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची विनंती  संस्थांना आयोगाने केल्याचेही त्यांनी कळविले आहे.

इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच आयोगाकडून वेळोवेळी जाहिर करण्यात येणाऱ्या सुचनांसाठी आयोगाच्या वरील संकेतस्थळास उमेदवारांनी वेळोवेळी भेट द्यावी, असे आवाहनही आयोगाव्दारे करण्यात आले आहे.

Related posts

मी आणि माझं सरकार 24तास शेतकऱ्यांसोबत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना भावनिक साद; पत्र व्हायरल

Gajanan Jogdand

डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची संकल्पना; आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस केला सन्मानपूर्वक परत, जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविली एवढी मोठी मोहीम

Santosh Awchar

गोविंद शिंदे यांनी उंचावली सेनगावची मान; तिरंगा सायकल राइडमध्ये मिळविले प्रथम पारितोषिक

Gajanan Jogdand

Leave a Comment