मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील नगर परिषदेच्या मुख्य इमारतीतील तळमजला तसेच भिंती धूम्रपानाने रंगल्या असून याची पाहणी मुख्याधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळीच केली. यावेळी त्यांना अस्वच्छता आढळून आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच कार्यालयात आले की, चेंबरमध्ये मध्ये भेटण्यास सांगितले.
हिंगोली येथील नूतन इमारतीचे लाखो रुपये खर्चून बांधकाम करण्यात आले आहे. नगर परिषदेची ही इमारत टुमदार असून तिच्यावर ‘लव हिंगोली’ असे लिहिल्याने अनेकांचे लक्ष केंद्रित करत आहे.
अशा या इमारतीत दोन वर्षापूर्वी नगर परिषदेचा प्रशासकीय कारभार सुरू झाला, मात्र अवघ्या काही दिवसात या इमारतीत अस्वच्छता झाली आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील भिंती तसेच वरील भिंती धूम्रपान आणि रंगल्या असून तळमजल्यावरील फरशी अस्वच्छ असल्याचे मुख्याधिकाऱ्यांना दिसून आले.
हिंगोली नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये राज्यस्तरावर चांगली कामगिरी केली आहे, मात्र नगर परिषदेच्या इमारतीतच अस्वच्छता आढळून आली आहे.
शुक्रवार (7 जून) रोजी सकाळी 10 ते सव्वा दहा वाजे दरम्यान मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी इमारतीच्या तळमजल्यावरील स्वच्छतेची पाहणी केली असता त्यांना सर्वत्र अस्वच्छता आढळून आली. त्यामुळे त्यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला. त्यांनी संबंधितांना भ्रमणध्वनी वरून चांगलेच खडसावून कार्यालयात येण्याआधी मला चेंबरमध्ये भेटा असे सांगितले.