मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर तसेच जिल्ह्यात निमशहरी भागात तसेच शहरी भागात पतंग उडविण्याची ‘क्रेझ’ दिसून येते. सदरील पतंगांना नायलॉन मांजा सर्रास वापरण्यात येतो. सदरील मांजा पर्यावरणास हानिकारक असून पक्षांच्या तसेच विविध प्राण्यांसह माणसाच्या जीवाला देखील त्याने धोका उत्पन्न होत आहे. सदरील बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या दुकानांची झाडाझडती घेत तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच चार ठिकाणी छापे मारून तीस हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात चिनी मांजा विक्रीवर आळा घालण्यासाठी वेगवेगळे पथके स्थापन केले आहेत. तर चिनी नायलॉन मांजा विकीकरणारे पतंग विक्रेत्याच्या दुकानावर छापा मारून गुन्हे दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्री संदर्भाने कार्यवाही चालु आहे. आज रोजी पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण हददीत खटकाळी बायपास परिसरात राणी सती मंदिराजवळ इसम नामे सुर्यकिरण मदनलाल बगडीया (रा. गंगानगर, हिंगोली) यांनी सदर ठिकाणी नायलॉन मांजा विक्री करित आहेत, अशी माहिती मिळाल्या वरून पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने छापा मारून ४० नायलॉन मांजाचे रोल (किं.अं २० हजार रुपये.) चा मुददेमोल जप्त करून मांजा विक्रेत्या विरूध्द पो.स्टे हिंगोली ग्रामीण येथे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच पोउपनि श्री माधव जिव्हारे यांचे पथकाने पोलीस स्टेशन हिंगोली शहर हददीतील हरण चौक येथील इसम नामे महेश बालाराम मुदीराज यांचे दृकानात छापा मारून नायलॉन मांजाचे ०९ रोल (किं. अं. ४ हजार ५००/- रू) व मुददेमाल जप्त करून सदर इसमा विरूध्द हिंगोली शहर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल केला आहे. तसेच महाविर चौक हिंगोली येथील इसम नामे संतोष नारायण धाबे यांच्या पतंग विही सेंटर मध्ये छापा मारून नायलॉन मांजाचे ११ रोल (किं. अं ५ हजार ५००/- रू) चा मुददेमाल जप्त करून मांजा विकृत्या विरुध्द हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथकाने सावरकर नगर हिंगोली येथील साहु पतंग विक्री सेंटर येथे तसेच कळमनुरी व सिरसम येथे सुध्दा पतंग विक्री दुकानात छापे मारून नायलॉन मांजा विक्री संदर्भात झाडाझडती घेण्यात आली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु यांचे पथक वसमत शहर व परिसरात नायलॉन मांजा विक्री संदर्भात पतंग विकेत्यांच्या दुकानांची झाडाझडती घेत आहेत.
हिंगोली जिल्हा पोलीस दला तर्फे हिंगोली जिल्ह्यातील पतंग विक्रेत्यांना अवाहन करण्यात येते की, नायलॉन मांजा बाळगुनये व विक्रीवरूनये जनेकरून पर्यावरणास व मानवी जिवितास हानी पोहचनार नाही. जो कोनी नायलॉन मांजा बाळगतांना किंवा विक्री करताना आढळल्यास यापुढे सुध्दा भारतीय दंड संहिता व पर्यावरण संरक्षण कायदया अन्वये गुन्हे दाखल करून कठोर कार्यवाही करण्यात येईल. सर्वांन ो लीसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे.