Marmik
Hingoli live दिसलं ते टिपलं

हिंगोलीत जैविक कचऱ्याचा प्रश्न गंभीर; आरोग्य यंत्रणेला गांभीर्य नाही!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-

हिंगोली – शहरातील एनटीसी भागात असलेल्या अनेक टुमदार दवाखान्यातून जैविक कचरा कुठेही उघड्यावर टाकून दिला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या परिसरातील पर्यावरण धोक्यात येऊन नागरिकांचे व जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे आरोग्य यंत्रणेलाच याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसते.

हिंगोली शहरातील एनटीसी भागात नामांकित दवाखाने स्थापन झाले आहेत. ‘डॉक्टर लाईन’ म्हणूनही या भागाकडे पाहिले जाते. या भागात दोन दोन ते तीन तीन मजली इमारतींमध्ये झगमगाट दिसेल असे दवाखाने आहेत. येथील काही खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत आहेत.

आता अशी ‘डॉक्टर लाईन’ म्हटलं की स्वच्छता आलीच नीटनेटकेपणाही आला. मात्र अनेक दवाखान्यांना स्वच्छतेची काही एक देणे घेणे नसल्याचे दिसते. दवाखान्यातील स्वच्छता तेवढी पाहिली जाते व जैविक कचरा मात्र उघड्यावर कुठेही फेकून दिला जात असल्याचे चित्र आहे.

सदरील कचऱ्यामध्ये वापरण्यात आलेले सलाईन, सिरिंजस, वापरण्यात आलेल्या पट्ट्या, औषधांच्या बाटल्या आदींचा समावेश आहे. सदरील कचरा उघड्यावर टाकून दिला जात असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तसेच मोकाट जनावरे व श्वान हे संबंधित कचऱ्यात अन्न शोधत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसते. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराकडे लक्ष देऊन आरोग्य यंत्रणेची चौकशी करावी, अशी सुप्त मागणी नागरिकांतून केली जात आहे.

सलाईनच्या बाटल्या भंगारात?

एनटीसी भागातील अनेक दवाखान्यांमधून वापरण्यात आलेले सलाईनच्या बॉटल तसेच इतर जैविक कचरा कुठेही बाहेर फेकून दिले जात आहे. सदरील सलाईन च्या बॉटल भंगार वेचणारे व्यक्ती व काही बालके गोळा करून ते आपल्या सोबत नेत आहेत. त्यामुळे सदरील सलाईन्सच्या बॉटल इतर प्लास्टिक सोबत भंगारात तर जात नाही ना? याची आरोग्य विभागाकडून चौकशी करण्याची गरज आहे.

दवाखान्यातील जैविक कचरा जातो कुठे ?

शहरातील अनेक दवाखान्यातून निघणारा जैविक कचरा हा नगरपरिषदेच्या घंटागाडीत टाकला जात असल्याचे दिसते. सदरील कचरा नंतर इतर कचऱ्यासोबत लिंबाळा मक्ता येथे असलेल्या एमआयडीसी परिसरालगत असलेल्या डंपिंग ग्राउंड वर टाकून दिला जातो. जैविक कचऱ्यामुळे कचऱ्यामुळे येथील पर्यावरण आणखीच दूषित होत आहे. त्यामुळे दवाखान्यातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचे दिसते.

सलाईनच्या बाटल्या भंगारात

Related posts

विद्यासागर महाराज यांच्या महाराष्ट्रातील विहारास पोलिस बंदोबस्त द्या

Santosh Awchar

नगरपरिषदेची नूतन इमारत अस्वच्छ; मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर !

Santosh Awchar

बचतगटातील महिलांच्या मागे मी सदैव भावासारखा उभा राहीन – आमदार संतोष बांगर

Santosh Awchar

Leave a Comment