मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या सतर्कतेने वसमत – नांदेड मार्गावरील माळवटा फाटा पुलाजवळ दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडून जेरबंद केले. पोलिसांना पाहून घटनास्थळावरून तिघे अंधाराचा फायदा घेत तिघे पळून गेले. यावेळी पथकाने दरोडा टाकण्याच्या साहित्यासह एकूण एक लाख 70 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यात चोरी, घरफोडी, दरोडा आदी गुन्हे घडू नयेत, त्यावर नियंत्रण असावे म्हणून स्थानिक व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नियमित तपासणी सोबतच सतर्क रात्रगस्त व पेट्रोलिंग इत्यादी बाबत हिंगोली पोलिसांबाबत नियमित कार्यवाही केली जात आहे.
14 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू आणि त्यांचे पथक वसमत परिसरात पेट्रोलिंग करत असताना पथकास माहिती मिळाली की, वसमत ते नांदेड रोडवरील माळवटा फाटा जवळील पुलाजवळ काही इसम संशयास्पदरित्या अंधारात दबा धरून व एखादा गंभीर मालाविरुद्धचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे थांबले आहेत, अशा प्रकारची माहिती मिळाली.
यावरून व सदर इसमांची हालचाल ही संस्था वाटल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासह सदर ठिकाणी छापा मारला असता पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत तीन इसम घटनास्थळावरून पळून गेले.
घटनास्थळी पोलिसांना विजय उर्फ बंटी चांदू आढाव (वय 23 वर्ष), रामदास गजानन पवार (वय 22 वर्षे दोन्ही रा. कामठा ता. अर्धापूर जि. नांदेड) यांना पकडले त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे दरोडा टाकण्यासाठी लागणारे हत्यार जात लोखंडी तलवार (27 इंच लांब), एक लोखंडी रॉड, मिरची पूड, बॅटरी, दोरी आणि दोन मोटारसायकली असा एकूण एक लाख 70 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
पोलीस पथकाने सर्व साहित्य जप्त करून आरोपी व घटनास्थळावरून पळून गेलेले त्यांचे साथीदार श्रीकांत प्रल्हाद कसबे (रा. कामठा) वैभव लक्ष्मण सरोदे व भैय्या साहेब कोलते (दोन्ही रा. पांगरगाव ता. मुदखेड जि. नांदेड) अशा पाच व्यक्ती विरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंविसह कलम 4 / 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वसमत ग्रामीण पोलीस करत आहेत.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू पोलीस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, तुषार ठाकरे, नागरे, दीपक पाटील यांनी केली.