मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना एका नव्याकोऱ्या गणरायाच्या गाण्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण आता गणपती बाप्पांच्या आगमनासाठी भाविकांबरोबरच ‘आठवी-अ’चे कलाकारही सज्ज झाले आहेत. ‘आठवी-अ’च्या बालकलाकारांचा बालगणेश आला असल्याचं समोर आलं आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी ‘आठवी-अ’चे सर्व कलाकार वाट पाहत होते.
अखेर या कलाकारांची इच्छा पूर्ण झाली आहे. ‘बाप्पा आमचा आला’ हे नवंकोर गाणं घेऊन ‘आठवी अ’ ची टीम पुन्हा सज्ज झाली आहे. ‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या वेबसीरिजने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या वेबसीरिजनंतर आता ‘बाप्पा आमचा आला’ हे गाणं भाविकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
‘इट्स मज्जा’ ओरिजिनल व ‘मीडिया वन सोल्यूशन्स’ने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आणि हीच हमी ‘इट्स मज्जा’ आगामी गणपती स्पेशल गाण्यातून पूर्ण केली आहे. ‘इट्स मज्जा’ लवकरच प्रेक्षकांसाठी गणपती विशेष गाणं ‘बाप्पा आमचा आला’ हे गाणं घेऊन आलं आहे. यंदाचा गणशोत्सव खास करण्यासाठी ‘मीडिया वन सोल्यूशन्स’ व ‘इट्स मज्जा’ ‘बाप्पा आमचा आला’ हे गणपती स्पेशल गाणं घेऊन आलं आहे.
या नव्या गाण्यात अथर्व अधाटे, सृष्टी दनाने, संयोगिता चौधरी, ओम पानस्कर, आध्या क्षीरसागर, श्रेयस काटके, रुद्र इनामदार, सत्यजित होमकर, शिवानी पवार, विनीत पवार, प्राजक्ता घार्गे, ऋषिकेश डीवाय पवार, प्रतीक कुचेकर, प्रतीक निंबाळकर, साहिल मोरे ही ‘आठवी अ’ या वेबसीरिजमधील कलाकार मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
बाप्पाच्या आगमनासाठी ही कलाकार मंडळी खूप उत्साही असून ‘बाप्पा आमचा आला’ गाण्यात धुमाकूळ घालताना दिसत आहेत. बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी ते अगदी बाप्पाला निरोप देताना भावुक झालेले कलाकार असं सुंदर चित्रीकरण पाहणं गाण्यात रंजक ठरतंय.
‘बाप्पा आमचा आला’ हे गाणं ओमकार कानिटकर व आंचल ठाकूर यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर या गाण्याचे शब्दांकन समीर पठाण यांनी केलं आहे. सुमधुर भक्तीगीताला सुरेल चाल देण्याचे काम मंदार पाटील यांनी केलं आहे. गाण्याचं दिग्दर्शन नितीन वाडेवाले आणि नृत्यदिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केलं आहे.
त्याचबरोबर ‘बाप्पा आमचा आला’ या भक्तीगीताच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी पार पाडली आहे. तर प्रोजेक्ट हेड म्हणून या गाण्याची जबाबदारी अंकिता लोखंडे यांनी उत्तमरित्या संभाळली आहे. ‘आठवी-अ’च्या कलाकारांनी गाण्यात केलेली धमाल मजामस्ती पाहणं रंजक ठरत आहे.