Marmik
Hingoli live News महाराष्ट्र

Hingoli राज्याला केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच मिळाले, हे सरकार लोकांपर्यंत पोहोचले नाही – जयंत पाटील

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – महाराष्ट्राला केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच मिळाले. त्यामुळे राज्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती असतानाही लोकांना मदत मिळाली नाही असे सांगून मंत्रिमंडळाचा विस्तार अडकला कशात असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगोली येथे विद्यमान सरकारला केला.

14 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नांदेड वरून वाशिमला जात असताना त्यांनी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात थांबून प्रसारमाध्यमांत सोबत संवाद साधला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील जनता अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीला तोंड व पाठबळ देणाऱ्या सरकारची वाट बघत आहे; मात्र हे सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे असल्याचे सांगून मंत्री मंडळ विस्तार न झाल्याने हे सरकार लोकांपर्यंत पोहोचत नाही असे सांगितले. यावेळी जयंत पाटलांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आमदार संतोष बांगर यांचे व्हायरल व्हिडिओ ही कार्यकर्त्यांना दाखवले.

विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला असता तर मदतीसाठी पोहोचायला इतर मंत्र्यांची मदत झाली असती, त्यांच्यात काही मतभेद आहेत का असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला. तसेच मंत्रीमंडळ आभारच अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यामुळे त्यांनी असे काहीही निर्णय घेणे अपेक्षित नाही, असे सांगून पूर्वीचा निर्णय बदलून जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा असल्याचे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माधव कोरडे, बालाजी घुग, संजय दराडे, बि. डी. बांगर, संतोष गुठे आदींची उपस्थिती होती.

Related posts

‘जिथे कमी तिथे आम्ही’ उपक्रमांतर्गत 18 जूनला गुणगौरव सोहळा

Santosh Awchar

हमालवाडी येथील 5 गुन्हेगार दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार! डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची कठोर कारवाई

Gajanan Jogdand

संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने घेतला गणेश मूर्ती निर्माल्याचा निर्णय

Santosh Awchar

Leave a Comment