Marmik
Love हिंगोली

जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया !

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील नारायण नगर मधील एका खाजगी दवाखान्यासमोर जल कुंभाची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाया गेले. आहे सदरील जलवाहिनी खोकल्यानंतर अर्धा ते पाऊण तास उलटून गेला तरी नगर परिषदेचे कर्मचारी येथे हजर न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. यावरून हिंगोली नगर परिषदेला पाण्याचे काही गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न पडू लागला आहे.

हिंगोली शहरातील नागरिकांना नगरपरिषदेकडून मागील काही वर्षांपासून तीन ते चार दिवसानंतर नळाद्वारे पिण्याचे पाणी सोडले जाते. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरी नगर परिषदेने आपल्या पाणी वितरणात कोणताही बदल केला नाही.

सध्या नगर परिषदेकडून शहरातील विविध भागात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिक पाण्याचा काटकसरीने वापर करतात. नागरिकांना पाण्याचे महत्व पटले असले तरी नगर परिषदेला याचे काही गांभीर्य नसल्याचे दिसते.

तसेच मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही एवढ्या दिवसाआड पाणीपुरवठा का असा प्रश्नही नागरिकांना पडू लागला आहे. त्यातच 10 सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी अंदाजे दीड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास हिंगोली शहरातील नारायण नगर भागातील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाने येथून जाणारी जलवाहिनी काम करत असताना फुटली. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले.

जलवाहिनी फुटल्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारी येथे दाखल होऊन फुटलेल्या जलवाहिनीचे काम तातडीने हाती घेतील अशी आशा होती, मात्र जवळपास पाऊण ते एक तास झाला तरी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी येथे दाखल झाले नाही. परिणामी लाखो लिटर पाणी वाया गेले असून पालिकेला पाण्याचे गांभीर्य आहे की नाही असा प्रश्नही पडू लागला आहे.

एकीकडे शहरातील नागरिकांना चार ते पाच दिवसात पाणीपुरवठा करायचा आणि दुसरीकडे अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होऊ द्यायचा हा दु टोपीपणा नगर परिषदेने आता तरी थांबवावा अशी आशा नागरिकांना आहे. वृत्त लिहीपर्यंत येथे नगर परिषदेचे कर्मचारी अथवा अधिकारी दाखल झाले नव्हते.

Related posts

बस स्थानकातील शौचालय म्हणजे ‘…असून खोळंबा’, अपंग व्यक्तींसह प्रवाशांची अवकळा!

Santosh Awchar

सोसाट्याच्या वाऱ्याने नूतन बस स्थानकाचे पत्रे कोसळली! सिलिंग फॅनही तुटून पडला

Gajanan Jogdand

आपत्ती व्यवस्थापन: प्रत्येक गावातून निवडले जाणार भूकंप मित्र! प्रशिक्षणासाठी इच्छुक स्वयंसेवकांनी तहसील कार्यालयात नोंदणी करावी

Santosh Awchar

Leave a Comment