मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील आगाराची परभणीहून परतणारी बसचे पुढील चाक नागेश वाडी पुढे निखळले. चाक निखळून तेच फुटावून अधिक अंतरावर गेले. तर बस बिना चाकाची 30 फूट घासत गेली. सुदैवाने यात चालक वाहकासह कोणाही प्रवाशाला इजा झाली नाही.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगाराची एम एच 13 सी. यु. 6917 ही बस 29 एप्रिल रोजी हिंगोलीहुन परभणी फेरी काढल्यानंतर परभणीहून हिंगोली कडे परतत होती. बस मध्ये सुमारे 50 ते 60 प्रवासी होते. नागेशवाडी पुढे बसचे अचानक पुढील चाक निखळले.
सदरील चाक निखळून अंदाजे 30 फुटावून अधिक अंतरावर गेले. तर बस तीस फुटापर्यंत घासत गेली. सुदैवाने यात चालकासह वाहक आणि प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही; मात्र महामंडळाचे नुकसान झाले आहे.
15 ते 20 लाख किलोमीटर चालविल्या जातात बसेस
काँग्रेस सत्तेत होते तेव्हा महामंडळाच्या बसेस 5 लाख किलोमीटर चालून नंतर त्या उपयोगात आणल्या जात नव्हत्या. त्यात वाढ करून 8 लाख किलोमीटर करण्यात आली. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सदरील मर्यादा वाढवून 15 लाख किलोमीटर करण्यात आली. तर आता 20 लाख किलोमीटर मर्यादा करण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.