मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार संतोष (दादा) बांगर यांना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने संदेश शिखरे या युवकांनी स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून दिले आहे.
महाराष्ट्रातील मातंग समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. आरक्षणाच्या वर्गवारीसाठी अविरतपणे संघर्ष सुरूच आहे. वेळोवेळी राज्यकर्त्यांनी केवळ आश्वासनेच दिलेली आहेत. प्रश्न मात्र आणखीनही सुटलेला नाही.
मातंग समाजाच्या प्रश्नांची जाण असणारे शिवसेनेचे महाराष्ट्रातील धडाडीचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार संतोष (दादा) बांगर यांना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने संदेश शिखरे या युवकाने स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून दिले आहे.
तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात मातंग समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लक्षवेधी द्वारे मांडण्याची गळही आमदार संतोष (दादा) बांगर यांना घालण्यात आली आहे.
यावेळी आमदार संतोष (दादा) बांगर यांनी मातंग समाजाच्या आरक्षणाचा हा प्रश्न अधिवेशनात मांडणार असल्याचे लहुजी शक्ती सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मातंग समाज बांधव व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.