Marmik
Hingoli live क्राईम

चालत्या ट्रक मधून सुपारीची पोते चोरणारे चोरटे नांदेड येथून जेरबंद; एक लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील पोलीस स्टेशन बाळापुर अंतर्गत वारंगा फाटा भागामध्ये 20 ऑगस्ट 2023 रोजी रात्री आठ ते दहा वाजेच्या सुमारास हैदराबाद दिल्ली जाणाऱ्या ट्रक मधून सुमारे दोन क्विंटल चाळीस किलो सुपारी किमती अंदाजे 1 लाख 40 हजार रुपयाची चालत्या ट्रक मधून सुपारीचे पोते चोरी गेल्यासंदर्भाने पोलीस स्टेशन बाळापुर येथे गुन्हा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तात्काळ छढा लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक जी .श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, सदर प्रकारची चोरी करणारे सराईत आरोपी हे नांदेड येथील असून त्यांची नावे शेख मोईन शेख महमूद (रा. नंदीग्राम हाऊसिंग सोसायटी मिल्लत नगर नांदेड), शेख शाहरुख शेख अजगर (रा.मलंग बाबा बिल्डिंग जवळ देगलूर नाका नांदेड), सोहेल खान (रा. कांदा मार्केट जवळ इतवारा नांदेड), इलियास खान उर्फ इल्लू (रा. खुदबे नगर चौरस्ता नांदेड) असे असल्याचे निष्पन्न झाले.

सदर आरोपी पैकी शेख मोहशिन शेख महमूद यास शिवशक्ती नगर परिसर नांदेड येथून ताब्यात घेतले असून चोरीची सुपारी घेणारा आरोपी नामे शेख अल्ताफ शेख युनूस यास वसमत येथून ताब्यात घेऊन सुमारे 65 किलो चोरीची सुपारी जप्त करण्यात आली आहे.

तसेच सदर गुन्ह्यात चोरीसाठी वापरलेली मोटार सायकल व मोबाईल तसेच चोरलेली सुपारी असा 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करून पोलीस स्टेशन बाळापुर येथे हजर केले आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे स्थागुशा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे , पोलीस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर ,गणेश लेकुळे ,आकाश टापरे ,नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

Related posts

मुगाला लक्ष्मी पावली! 6 हजार 320 रुपयांचा मिळाला दर

Santosh Awchar

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 16 सोशल मीडिया वापरकर्त्यांना नोटीस

Santosh Awchar

हिंगोली लोकसभा निवडणूक : पहिल्याच दिवशी 119 अर्जांची उचल; एकही अर्ज दाखल नाही

Santosh Awchar

Leave a Comment