मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / औंढा नागनाथ
भाग – दोन
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथे लोकार्पण करण्यात आलेल्या सिद्धेश्वर आयुष्यमान आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेची सोय नाही तसेच औषधोपचारांची ही वानवा आहे. त्यामुळे हे आरोग्य केंद्र नेमके कोणत्या उद्देशासाठी कार्यरत झाले ही सत्यता जाणून घेण्यासाठी नागरिकांत उत्सुकता असल्याचे दिसते.
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर आयुष्यमान आरोग्य केंद्राचे लोकार्पण मोठ्या थाटात करण्यात आले. मात्र या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी व एक पारिचारिका कार्यरत आहे. सदरील अधिकारी व कर्मचारी हे येथे कधीही उपलब्ध नसतात. बहुतांश वेळा हे आरोग्य केंद्र कुलूप बंद अवस्थेत राहते. त्यातच आरोग्य केंद्रात पाणी व वीज नाही. सध्या उन्हाळा असून आरोग्य केंद्रात पाणी व विजेची नितांत आवश्यकता आहे.
मात्र या दोन्ही मूलभूत गरजांकडे आरोग्य यंत्रणेकडून दुर्लक्ष केले गेले आहेत. तसेच हे आरोग्य केंद्र कुलूप लावलेल्या अवस्थेत आढळते बहुतांश वेळा हे आरोग्य केंद्र बंदच असते. याकडेही आरोग्य यंत्रणेने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
पूर्वी वसमत तालुक्यातील लोहरा येथील आरोग्य केंद्राची औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक गावे जोडण्यात आली होती. या आरोग्य केंद्रात महिलांच्या शस्त्रक्रिया होत असत. त्याशिवाय या आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारची व्यवस्था व औषध उपचार रुग्णांना मिळत नव्हते.
सिद्धेश्वर येथील नवीन आयुष्यमान आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियांचीही वाणवा असून कुत्रा चावलेल्या रुग्णांना किंवा साप चावलेल्या रुग्णांना केव्हा विंचू चावलेल्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचे औषध उपचार येथे केले जात नाहीत, तशी औषधेही येथे उपलब्ध नाहीत.
तसेच अपघाताचा एखादा रुग्ण आल्यास त्याच्यावर औषधोपचार करण्याबाबतही येथे सोयी – सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्य केंद्र नेमके कोणत्या उद्देशासाठी उभारण्यात आले आणि ते एवढा गाजावाजा करत कार्यरत करण्यात आले याबाबतची उत्सुकता नागरिकांतून दिसून येत आहे.