मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / मनोज जयस्वाल :-
औंढा नागनाथ – श्रावण सोमवार व नागपंचमी निमित्त औंढा नागनाथ तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र श्री सिद्धनाथ महाराज यांचे मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून शिस्तीत दर्शन घेतले.
औंढा नागनाथ तालुक्यातील तीर्थक्षेत्र सिद्धनाथ संस्थान गांगलवाडी नाथगंगा व सिद्धगंगा संगमावर वसलेल्या मंदिरात 21 ऑगस्ट रोजी श्रावणातील पहिल्या श्रावण सोमवार व नागपंचमी निमित्त हिंगोली जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील विविध भागातून हजारो भाविक भक्तांनी दर्शनासाठी सकाळपासून दाखल झाले होते.
हजारो भाविकांनी भक्तांनी रांगेत उभे राहून शिस्तीत सिद्धनाथ महाराजांचे दर्शन घेतले. दिवसभर भजन, कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
धर्मादाय कार्यालयातील अधिकारी यांनी सिद्धनाथ येथे संपत्ती भेट दिली असता संस्थांच्या वतीने महंत आत्मानंदगिर महाराज यांनी त्यांचा सत्कार केला. दिवसभर आलेल्या भक्तांना संस्थांच्या वतीने फराळ व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
श्रावण महिन्यानिमित्त श्री सिद्धनाथ मंदिर गांगलवाडी येथे दररोज कार्यक्रम पार पडत आहेत. यामुळे येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.