सेनगाव : पांडुरंग कोटकर
तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या भानखेडा येथील श्री विठ्ठल – रुक्मिणी चे हजारो भाविकांनी आषाढी एकादशीनिमित्त येऊन दर्शन घेतले.
सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील प्रतिपंढरपूर म्हणून श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरास ओळखले जाते. आषाढी एकादशीनिमित्त येथे पंचक्रोशीतील व सेनगाव तालुक्यातील हजारो भाविक येऊन दर्शनाचा लाभ घेतात 10 जुलै रोजी हजारो भाविक भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त येथे येऊन श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी येथे येऊन दर्शन घेतले.
यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, जिल्हा परिषद सदस्य द्वारकादास सारडा यांच्यासह भानखेडा गावातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गावकरी मंडळी सोबत टाळमृदुंगाच्या गजरात भजन केले व फराळाचा आस्वाद घेतला.