मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत मोक्का मधील तीन फरार आरोपीस अटक करण्यात हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखा व कळमनुरी पोलीस ठाणे यांना यश आले आहे.
22 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी नऊ वाजेच्या सुमारास कळमनुरी येथील नवीन बसस्थानक येथे हातात तलवारी घेऊन काही लोकांनी दंगा करून फिर्यादीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या संदर्भाने कळमनुरी पोलीस ठाण्यात 13 लोकांविरुद्ध भादवी च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान कलम 3 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोका) हे कलम वाढ करण्यात आले होते.
13 आरोपींपैकी एकूण 7 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली. इतर 3 मुख्य आरोपी हे फरार राहून अटक चुकवीत होते.
मात्र हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर मोका गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांना सूचना देऊन पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस स्टेशन कळमनुरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार करण्यात आले होते. कळमनुरी पोलीस ठाणे पथकाने फरार आरोपी नामे बबलूसिंग हत्यारसिंग टाक यास कळमनुरी येथून ताब्यात घेतले.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश सिंह उर्फ गण्या हत्यार सिंग टाक यास जालना येथून ताब्यात घेतले व दुसरा फरारारूपी नावे गणपत सिंग हत्यार सिंग टाक यास कळमनुरी येथून ताब्यात घेतले असून सदर तीन आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे हे करत आहेत.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे व त्यांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे अंमलदार संभाजी लेकुळे, गजानन पोकळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.