Marmik
Hingoli live

यंदा हिंगोली जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सन 2024 या वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 25 एप्रिल, 2024 रोजी हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अल ऊर्फ चिरागशहा दर्गा उर्स हिंगोली, बुधवार, दि. 11 सप्टेंबर, 2024 रोजी जेष्ठ गौरी पूजन (महालक्ष्मी), गुरुवार, दि. 31 ऑक्टोबर, 2024 रोजी नरक चतुदर्शीनिमित्त स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.

वरील तिन्ही स्थानिक सुट्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेतंर्गत कार्यालये, नगर परिषद कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागार महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना लागू राहतील.

Related posts

सेनगाव येथे कयाधू नदी जनसंवाद यात्रा कार्यक्रम, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले मार्गदर्शन

Gajanan Jogdand

जिल्ह्यात सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरोग रुग्ण शोध मोहिम सुरू ; अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांचे निर्देश

Santosh Awchar

हिंगोलीत बसपा चा ‘होऊ शकत है’चा संकल्प

Gajanan Jogdand

Leave a Comment