हिंगोली : संतोष अवचार /-
पाच हजार रुपयांची लाच घेताना सहकार अधिकाऱ्यांसह सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय हिंगोली येथील तिघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
हिंगोली येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहकारी अधिकारी श्रेणी 1चे आत्माराम पूजा राठोड (रा. जिजामाता नगर हिंगोली), सहाय्यक निबंधक वर्ग दोनचे अभयकुमार देवराव कटके (रा. पार्वती नगर परभणी) तसेच संजय पुंजाराम पिसाळ कर (वर्ग-3 रा. हनुमान नगर हिंगोली) यांनी तक्रारदार यांचे सावकारी परवाना नुतनीकरण करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. यातील लोकसेवक अभय कुमार देवराव कटके यांची लाच मागणे आहे किंवा कसे याची पडताळणी 13 जून रोजी करण्यात आली. तेव्हा त्यांनी लाच रक्कम स्वीकारण्याची सहमती दिली 23 जून रोजी सदरील लाच स्वीकारताना संजय पुंजाराम पिसाळ कर यांनी ही लाच स्वीकारली सापळा रचून सर्व आरोपींना पकडण्यात आले. याप्रकरणी वरील तिघाही अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोलीचे पोलीस उपाधीक्षक निलेश सुरडकर, सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोलीचे पोलीस उपाधीक्षक निलेश सुरडकर, सापळा कारवाई पथक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, पोलीस निरीक्षक विजय पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युनुस सिद्दिक, पोह विजय उपरे, विजय शुकला, पोना रुद्रा कबाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंडे, महिला पोलीस नाईक योगिता अवचार, पोलीस शिपाई राजाराम, चापोना हिम्मतराव सरनाईक, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग युनिट हिंगोली यांनी केली पुढील तपास पोलीस उपाधीक्षक निलेश सुरडकर हे करत आहेत.