मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – शिक्षणाचा बाजार मांडून पालकांकडून पैशांची लूट करणाऱ्या सेनगाव येथील श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तोषनीवाल महाविद्यालयाच्या येआरटीएम इंग्लिश स्कूलच्या सीबीएससी पॅटर्नची चौकशी होणार आहे.
सेनगाव येथील श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तोषनीवाल महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त निधीतून मुलींचे वसतिगृह बांधले; मात्र सदरील वस्तीगृहात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे.
भ्रष्ट तोषनीवाल महाविद्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या नावाच्या इंग्लिश स्कूल वर सीबीएससी पॅटर्न असे टाकून केंद्रीय शिक्षण विभागाची मान्यता नसताना पालकांची सीबीएससी पॅटर्न च्या नावाखाली पैशांची लूट करून पालकांची फसवणूक केले जात आहे. तसेच गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश नाकारला जातो. केवळ पैसे कमविणे हाच या शाळेचा उद्देश असून कोरोना काळापासून चालकांची लूट केली जात आहे.
सदर शाळेवर योग्य ती कार्यवाही करून सीबीएससी पॅटर्न च्या नावाखाली शाळेने पालकांकडून जमा केलेले शुल्क पालकांना परत करावे व येयारटीएम इंग्लिश स्कूल सीबीएससी पॅटर्न ची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांनी सेनगाव येथील गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
या अनुषंगाने या भ्रष्ट महाविद्यालयाच्या एआरटीएम इंग्लिश स्कूलच्या सीबीएससी पॅटर्न लवकरच चौकशी होणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी गव्हाणे यांनी सांगितले आहे.