मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
लातूर – युनिसेफ सेंटर फॉर सोशियल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ते 6 ऑगस्ट या दरम्यान सकाळी साडेनऊ वाजता फुलाबाई बनसोडे मंगल कार्यालय नवीन रेणापूर नाका अंबाजोगाई रोड लातूर येथे महाराष्ट्रातील बालविवाह निर्मूलनासाठी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था लातूर चे अध्यक्ष राजेंद्र गिरी हे असून कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद लातूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल दशवंत हे आहे. तर या प्रशिक्षण शिबिरास जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय लातूर चे वर्षा पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य सल्लागार युनिसेफ मुंबईचे डॉक्टर सरिता शंकरन, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे, चाइल्ड लाइन लातुरच्या संचालक बाळासाहेब सूर्यवंशी यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेंटर फॉर सोशीअल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशनचे व्यवस्थापन कथा व्यवस्थापकीय संचालक निशित कुमार, बाल विवाह निर्मूलनाचे कार्यक्रम प्रमुख सीमा कोनाळे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन सेंटर फॉर सोशिअल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशनचे लातूर व सोलापूर जिल्ह्याचे कार्यक्रम समन्वयक विकास कांबळे यांनी केले आहे.
2 comments
उत्कृष्ट आणि शीघ्र लेखन करणारे दैनिक.. खूपच छान मार्मिक महाराष्ट्र..
Thank you sir