मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला 18 हजाराहून अधिक भाव मिळाला आहे. तर दोन दिवसांपूर्वी 10 हजाराच्या ही खाली गेलेल्या तुरीलाही 10 हजार 320 रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर कायम राहिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 11 मार्च रोजी हळदीला 18 हजार 350 रुपयांचा दर मिळाला हळद खरेदी 15 हजार 100 रुपयांपासून सुरू होऊन 16 हजार 725 तसेच चांगल्या हळदीला 18 हजार 350 रुपयांचा दर मिळाला.
हळदी खालोखाल तुरीला चांगला दर मिळाला. दोन दिवसांपूर्वी तूर दहा हजार रुपयाहून खाली घसरली होती. तिला सोमवारी 10 हजार 320 रुपये असा दर मिळाला.
तूर खरेदी 9 हजार 355 रुपयांपासून सुरू झाली. तुरीला 9 हजार 837 रुपये तर चांगल्या तुरीला 10 हजार 320 रुपये असा भाव मिळाला. ही दोन उत्पादने वगळता इतर पिकांना मात्र हवा तसा दर मिळाला नाही. सोयाबीनला साडेचार हजार रुपयांचाही दर मिळाला नाही.
हरभरा पिकास 5 हजार 500 रुपये असा भाव मिळाला. बाजारात गहू, ज्वारीला मात्र अजूनही चांगला दर मिळालेला नाही. बाजारपेठेत हळदीला असाच चांगला दर मिळत राहिल्यास हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.