मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभीजीनगर - खंडेलवाल दिंगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबाजार अंतर्गत राजाबजार जैन महिला मंडळाच्या वतीने मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त हळदी - कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमात 'जिवाची मुंबई' ही नाटिका सादर करण्यात आली.
या नाटिकेमध्ये निता ठोल, आशा काला, मनिषा पाटणी, संगीता गंगवाल यांनी नाटिका सादर करून 'जिवाची मुंबई' कशी राहते हे वेशभुषा करून निदर्शनास आणुन दिले. या नाटिकेला उपस्थित महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी महिलांनी महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केला होता. याच कार्यकमात एक मिनीट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषीक सपना पाटणी यांना मिळाले तर व्दितीय पारितोषीक नेहा पाटणी यांना मिळाले हे पारितोषीक चंदा कासलीवाल यांच्या तर्फे देण्यात आले. तर 'महाराष्ट्रीय पोशाख' ही स्पर्धा सुध्दा घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषीक साधना गंगवाल, व्दितीय पारितोषिक पुजा सेठी, तृतीय पारितोषीक आशा कासलीवाल यांना मिळाला. यावेळी हळदी - कुंकवाचे वाण वाटण्यासाठी अलका पहाडे, शोभा बाकलीवाल यांचे सहकार्य मिळाले.
कार्यकम यशस्वी करण्यासाठी महिलां मंडळाच्या अध्यक्षा निता ठोले, सुरेखा पाटणी, सुनिता कासलीवाल, मनिषा पाटणी, संगीता कासलीवाल, चंदा कासलीवाल, पुष्पलता कासलीवाल, सुनंदा कासलीवाल, पुष्पा सेठी, सुनिता पाटणी, शोभा ठोले, अनिता ठोले, कांता पहाडे, राजकुंवर ठोले, निर्मला सेठी, संगीता सेठी, सुनंदा सेठी, ज्योती कासलीवाल, सुवर्णा गंगवाल, संगीता प्रविण सेठी, चंदा चुडीवाल, सपना पापडीवाल, वैशाली कासलीवाल आदींनी प्रयत्न केले, अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली.