Marmik
Hingoli live क्राईम

दोन गुन्हेगार दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली चा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालणाऱ्या विरुद्ध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका घेत असे गुन्हे सतत करणाऱ्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे.

हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सेनगाव पोलीस ठाणे हद्दीतील आडोळ गावातील राहणारे सराईत गुन्हेगार कृष्णा सूर्यभान जुमडे (वय 25 वर्ष) व आदिनाथ शिवाजी हनवते (वय 25 वर्षे दोन्ही रा. आडोळ तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली) यांच्या विरुद्ध सेनगाव व हट्टा पोलीस ठाणे येथे मालाविरुद्ध एकूण तीन गुन्हे दाखल असून सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत. त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका उत्पन्न होत आहे.

त्यामुळे हिंगोली पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रकरणी कठोर प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिल्यावरून सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. व्ही. भोईटे व पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांनी नमूद आरोपींविरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग वसमत किशोर कांबळे यांनी सविस्तर चौकशी करून नमूद आरोपीच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिफारस केली.

यावरून नमूद प्रकरणी तपासणी करून डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये नमूद दोन्ही आरोपींना आज पासून पुढील दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबत आदेश कार्यालय आहेत.

हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन मधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्या बाबत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत.

Related posts

अंगणवाडीतील बालकांना शाळेचे गेट बंद! खेरडा येथील प्रकार

Gajanan Jogdand

मांजा खरेदी – विक्री करणाऱ्या तसेच साठा करणाऱ्या दुकानदारावर होणार कारवाई; विशेष पथकाची स्थापना

Santosh Awchar

… तर जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेवर भगवा फडकविला शिवाय राहणार नाही – आमदार संतोष बांगर

Santosh Awchar

Leave a Comment