Marmik
Hingoli live क्राईम

सरकळी येथील दोघे एका वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – तालुक्यातील सरकळी येथील दोन सराईत गुन्हेगारांना हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केले आहे.

हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुद्ध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका घेत असे गुन्हे सराईतपणे करणाऱ्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंध कार्यवाही करत आहेत.

हिंगोली पोलीस अधीक्षक यांनी आज रोजी नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीतील सरकळी गावातील राहणारे सराईत गुन्हेगार अरुण अर्जुन पाटोळे (वय 58 वर्ष) व मारुती अरुण पाटोळे (वय 35 वर्षे, दोन्ही रा. सरकळी ता. जि. हिंगोली) यांच्या विरुद्ध नरसी नामदेव पोलीस ठाणे येथे शरीराविरुद्ध एकूण दोन गुन्हे दाखल आहेत. सदरील गुन्हेगार हे सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत.

त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या आशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका उत्पन्न होत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी सदर प्रकरणी कठोर प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिले होते.

यावरून नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. बी. नागरे व पोलीस उपनिरीक्षक एच. एस. चिरामाडे यांनी नमूद आरोपींविरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली विवेकानंद वाखारे यांनी सविस्तर चौकशी करून नमूद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिफारस केली.

यावरून नमूद प्रकरणी सविस्तर चौकशी करून हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये नमूद दोन्ही आरोपींना आजपासून पुढील एका वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्या बाबत आदेश काढले आहेत.

हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिंग व ऑल आउट ऑपरेशन मधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्या बाबत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत.

Related posts

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

Santosh Awchar

मणिपूर अत्याचार प्रकरण: नराधमांना तात्काळ अटक करा; मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट लागू करा, आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रपतींना निवेदन

Santosh Awchar

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच वार्षिक सरासरीच्या 55 टक्के पाऊस

Santosh Awchar

Leave a Comment