Marmik
क्राईम

कोर्ट फरारी दोन आरोपी जेरबंद; 10 वर्षांपासून होते गायब

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील मागील दहा वर्षांपासून कोर्ट फरारी असलेल्या दोघांना हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून जर बंद केले आहे. या आरोपींना हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पाहिजे व फरारी असलेल्या आरोपींना पोलीस अधीक्षक यांनी विशेष मोहीम राबवून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्याला हजर करण्याबाबत आदेशित केले आहे.

यावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये तसेच आरसीसी नं. 139 / 2012 मधील कोर्ट फरारी शिवशंकर लक्ष्मण राजेपवाड (वय 35 वर्षे रा. मोघाडी ता. भोकर जि. नांदेड), भूमन्ना गंगाराम राजुलवार

(वय 43 वर्षे रा. पाळज ता. भोकर जि. नांदेड) यांना त्यांच्या मूळ मूळ गावातून ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून गुन्ह्याच्या तपासासाठी हिंगोली शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील व पोलीस अंमलदार प्रेमदास चव्हाण, हरिभाऊ गुंजकर व अजित सौर यांनी केली आहे.

सदरची कार्यवाही यापुढे सतत चालू राहणार आहे.

Related posts

पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदाराने घेतली 5 हजार रुपयांची लाच; आरोपीस अटक

Gajanan Jogdand

सारोळा येथे गावठी पिस्टल जप्त; एक जण ताब्यात

Santosh Awchar

देवदरी शिवारातील गावठी दारू अड्डा उध्वस्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment