Marmik
क्राईम

सतत गौण खनिजाची चोरी करणाऱ्या हिंगणी येथील दोघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून केले हद्दपार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – सतत दोन खनिजाची चोरी करणाऱ्या दोघांना हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये एक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या कारवाईमुळे वाळू माफियात एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुद्ध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका घेत असे गुन्हे सराईत करणाऱ्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली जात आहे.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगार गजानन पांडुरंग घुगे (वय 37 वर्ष), सुरेश उर्फ सनी महादेव कुटे (वय 33 वर्ष, दोन्ही रा. हिंगणी ता. जि. हिंगोली) यांच्याविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात अवैध गौण खनिजाच्या चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत.

सदरील गुन्हेगार सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत. त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे धोका उत्पन्न होत असल्याने पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रकरणी कठोर प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिले.

यावरून कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी नमूद आरोपींविरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाची हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश एस. दळवे यांनी सविस्तर चौकशी करून नमूद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातील हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिफारस केली.

यावरून नमूद प्रकरणी सविस्तर तपासणी करून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये नमूद दोन्ही आरोपींना आज पासून पुढील एक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्या बाबत आदेश काढले आहेत.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन मधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्या बाबत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत.

Related posts

घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; 1 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

मोटारसायकली चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा परदाफाश; दहा मोटारसायकली जप्त

Santosh Awchar

चोरीला गेलेली सोयाबीन शेतकऱ्याच्या स्वाधीन

Santosh Awchar

Leave a Comment