मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यातील उद्धव ठाकरे सरकार वर संकटे येत असतानाच 30 जून रोजी बहुमत चाचणी घेण्यात येणार आहे. याबाबत राज्यपाल भगतसिंग यांच्याकडे विनंती केल्यानंतर विधानसभेचे विशेष सत्र घेऊन बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे उद्धव ठाकरे सरकारला आदेशित करण्यात आले आहे.
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एकत्रित एकोणचाळीस आमदार असल्याचे त्यांच्याकडून म्हटले जात आहे. हे सर्व आमदार गुवाहाटी येथील एका खाजगी हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. त्यामुळे राज्यातील महा विकास आघाडी सरकार अल्पमतात येऊन कोसळण्याची शक्यता आहे. शिवसेना पुढे हे मोठे संकट येऊन उभे राहिले असून 30 जून रोजी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कसोटी लागणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी विशेष सत्र घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध करण्याचे पत्र 28 जून रोजीच काढले आहे.