मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सेनगाव येथील सर्वसामान्य आणि पालकांची घोर फसवणूक करणाऱ्या तथाकथित सीबीएसई इंग्लिश स्कूल असलेले तोष्णीवाल महाविद्यालयाचे एआरटीएम इंग्लिश स्कूल हे अनधिकृत भरत असून याप्रकरणी संस्थविरुद्ध कार्यवाही करावी, असे सेनगाव गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद गटशिक्षणाधिकारी प्राथमिक यांना पत्राद्वारे कळविले आहे.
सेनगाव येथील श्री. गजानन शिक्षण प्रसारक मंडळ येलदरी कॅम्प या संस्थेकडून एआरटीएम इंग्लिश स्कूल ही चालविली जाते. सदरील स्कूलच्या माध्यमातून मागील कित्येक वर्षांपासून सीबीएसई च्या नावाखाली पालकांची घोर फसवणूक केली जात आहे.
प्रत्यक्षात सदरील स्कूल ही सीबीएसई मान्यता प्राप्त नाही; मात्र संस्थेकडून सेनगाव तालुक्यातील तसेच तालुक्यातील लगतच्या गावातील गोळ्या – भाबड्या पालक व ग्रामस्थांची फसवणूक केली जात आहे. सदरील शाळेची इमारत देखील मुलींसाठी बनविण्यात आलेले वसतिगृह आहे.
प्रत्यक्षात येथे मुलींना वसतिगृहात न ठेवता एआरटीएम इंग्लिश स्कूल च्या माध्यमातून शिक्षणाचा बाजार भरविला जात आहे. या विरोधात मार्मिक महाराष्ट्र समूहाचे संपादक गजानन जोगदंड हे आवाज उठवत आहेत.
परंतु या संस्थेचे अध्यक्ष हे शिक्षणाचा हा बाजार थांबवत नाहीयेत. त्यांच्या विरोधात शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी कार्यवाही करत नसून त्यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याचा संशय येत आहे.
आता जिल्हा परिषद गटशिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे या प्रकरणात काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.