मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे दि. 25 फेब्रुवारी, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.10 वाजता परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण . 12.50 वाजता पोलीस मैदान हेलिपॅड हिंगोली येथे आगमन होईल.
दुपारी 1.00 वाजता मोटारीने रामलीला मैदानाकडे प्रयाण व तेथे आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
2.05 वाजता रामलीला मैदान येथून मोटारीने शास्त्रीनगर कडे प्रयाण. 2.15 वाजता शास्त्री नगर येथील श्री. राणा खुराणा यांच्या निवासस्थानी राखीव.
2.45 वाजता शास्त्रीनगर हिंगोली येथील हेलिपॅड हिंगोली कडे प्रयाण. 3.00 वाजता हिंगोली हेलिपॅड येथून आगमन करुन हेलिकॉप्टरने नांदेड कडे प्रयाण करतील.