मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – विविध उपक्रमद्वारे स्वच्छता अभियान अभियानास गती. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण पत्ता दोन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा बाबत जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष, सांडपाणी घनकचऱ्याचे वेळेत काम पूर्ण करण्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने व उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तसेच पाणीपुरवठा उप विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता व विस्तार अधिकारी, संबंधित गावाचे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना सूचना दिल्या आहेत.
तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आत्माराम बोंद्रे यांनी सदर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन बाबत प्रास्ताविक केले.
सदर 2023 च्या वार्षिक आराखडा कमी कुटुंबसंख्या असलेल्या 81 गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापन बाबत सदर कामाचे मोजमाप व तांत्रिक बाबी समजावून सांगाव्यात तसेच गावामध्ये तात्काळ कामे सुरू करावीत असे सूचना गटविकास अधिकारी यांना दिलेल्या आहेत.
विशेष अभियान १ ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये विविध उपक्रम गावामध्ये राबवावे. सदरील उपक्रमामध्ये पोस्टर स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, कविता स्पर्धा, टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, कापडी पिशव्यांचा वापर, प्रा. शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत, विविध संस्था, बचत गट , शाळेतील मुले मुली,गावातील युवक मंडळ, यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा तसेच गावातील नागरिक ग्रामस्थ , महिला प्रतिनिधी, यांनी मोठ्या प्रमाणात गावातील सार्वजनिक ठिकाणी, शाळा, मंदिर, रस्ते, सार्वजनिक स्वच्छता सफाई अभियान राबवावे.
सदरील अभियान गट विकास अधिकारी व नोडल विस्तार अधिकारी यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विशेष स्वच्छता अभियान राबवावे, असे आवाहन उप मुख्य अधिकारी पाणी व स्वच्छता आत्माराम बोंद्रे यांनी केले आहे.