मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जमिनीची मोजणी करण्यासाठी वसमत येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक व एका खाजगी सुमाने तक्रारदार यांच्याकडे 80 हजाराची लाच मागून तडजोडी अंती 50 हजार रुपये स्वीकारताना हे दोघेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
वसमत येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक मारुती प्रकाश घाटोळे (वय 33 वर्ष, रा. टाकळगाव, तालुका वसमत जिल्हा हिंगोली) व चांदू ईश्वरा भादेवाड (वय 32 वर्षे, रा. टाकळगाव, तालुका वसमत जिल्हा हिंगोली) यांनी तक्रारदार यांच्या आईचे शेत जमिनीची मोजणी करण्याबाबत कोर्टाने आदेश दिलेले आहेत.
सदर शेत जमीन मोजणी करण्याचे शासकीय कामासाठी 80 हजार रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती 50 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करून सदर लाच रक्कम आज रोजी खाजगी इसम चांदू ईश्वरा भादेवाड याच्या मार्फत शासकीय पंचा समक्ष स्वीकारली. या दोघांनाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे व अप्पर पोलीस अधीक्षक धर्मसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली येथील पोलीस उपाधीक्षक निलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, पोलीस निरीक्षक विजय पवार, पोह विजय उपरे, पंचलिंगे, मुंडे, चापोह अकबर, पोलीस शिपाई फुपाटे, वाघ सर्व लाच पुस्तक प्रतिबंधक विभाग हिंगोली यांनी केली पुढील तपास पोलीस उपाधीक्षक निलेश सुरडकर हे करत आहेत.
नागरिकांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी शुल्काव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.