मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील कोळसा येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी सर्व खेळाडूंचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.
यावेळी खेळाडूंमध्ये नारायण नायकवाल, पवन नायकवाल, कार्तिक नायकवल,कार्तिक लक्ष्मण नायकवाल, गोपाल घोंगडे,अजय घोंगडे, पंढरी लांडगे, या खेळाडूनी कबड्डीमध्ये प्रथम पारितोषिक खेचून आणले व या सर्व खेळाडूंची जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये निवड झाली. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भास्कर बेंगाळ यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ, सचिव अंकुशराव बेंगाळ, प्राचार्य अभिषेक बेंगाळ, कवी शिवाजी कह्राळे, क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक प्रकाशराव शिंदे पाटील, मुख्याध्यापक शिंदे आर.बी.,मुख्याध्यापक सरकटे व्ही.एस., पर्यवेक्षक कसाब पी.पी., तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.