मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / शहर प्रतिनिधी :-
सेनगाव – विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबराव वडकुते (सरपंच बाभूळगाव ), प्रा. डॉ. ओमप्रकाश चिलगर (श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी), श्रीनिवास चोरमले (इंजिनियर नांदेड), प्रा. अंकुश शिंदे (मानसोपचार तज्ञ), प्रा. प्रकाशराव शिंदे पाटील, संकेत पठाडे, नसीब भाई, केशवराव शिंदे, रामेश्वर पोले, बाळासाहेब शिंदे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
तसेच विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयचे प्राचार्य अभिषेक बेंगाळ, मुख्याध्यापक शिंदे आर.बी., सरकटे व्ही.एस. ,पर्यवेक्षक कसाब पी.पी. हे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच प्रा. डॉ.ओमप्रकाश चिलगर यांनी प्राणीशास्त्र या विषयांमध्ये पी.एच.डी.प्राप्त केली. त्यामुळे संस्थेतर्फे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच संस्थेमधून शिकवून आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी करणारे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अनिल मसुडकर, दीपक बेंगाळ, योगेश बोरुडे, अतुल कबाडी तसेच इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता 10 वी मधून प्रथम हर्षद केशवराव शिंदे ,समर्थ पवार, आरती मुठे, कार्तिक शिंदे, नितेश खंदारे तसेच इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमधून निकिता गायकवाड, किरण चव्हाण ,वैष्णवी कांगणे, ऋतुजा वराड, बारावी कलेमधून आकांक्षा काळे, ज्योती शिंदे, शकुंतला घोशिर या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक माटे यांनी संस्थेमधील सर्व युनिटचा परिचय करून दिला.
यावेळी विद्यार्थ्यांना श्रीनिवास चोरमले (पाटबंधारे विभाग ,नांदेड) यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाविषयी अमूल्य मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. ओमप्रकाश चिलगर यांनी संशोधन या विषयावर आपले मत मांडले.
भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर खूप संशोधन होणे अपेक्षित आहे. तसेच प्रा.प्रकाशराव शिंदे पाटील यांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच प्रा. अंकुशराव शिंदे (मानसोपचार तज्ञ) यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातुन अपयशाने खचून न जाता अपयशाला सामोरे कसे जावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भास्करराव बेंगाळ यांनी ग्रामीण भागामधिल विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आज ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे, असे आपले मत मांडले. पंजाबराव वडकुते यांनी स्वातंत्र्य या विषयावर आपले मत मांडले.
तसेच अध्यक्षीय समारोपामध्ये भास्करराव बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यापुढे ग्रामीण भागामध्ये आपल्या संस्थेमध्ये अनेक शैक्षणिक युनिट आणल्या जातील. यापेक्षा या संस्थेला उच्च क्षेत्रामध्ये पोहोचवल्या जाईल संस्थेला अनेक भौतिक सुविधा यापुढे पुरवल्या जातील.
यावेळी स्वरधारा म्युझिक ग्रुप, लोणार यांनी सुंदर देशभक्ती ,भक्तीगीत यांचे गायन केले. तसेच वटकळी येथील वारकरी ह.भ.प. यज्ञेश्वर शिंदे महाराज यांनी ‘आज सोनियाचा धनु’ हे भक्तीगीत गायले.
यावेळी सूत्रसंचालन शिंदे आर.बी. यांनी केले. या संस्थेमधील सर्व युनिटचे कर्मचारी व विद्यार्थी व परिसरातील सर्व पालक उपस्थित होते.