Marmik
Hingoli live

विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-

सेनगाव – तालुक्यातील कोळसा येथील विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ येथे भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ, संस्थेचे सचिव अंकुशराव बेंगाळ, प्राचार्य अभिषेक बेंगाळ, पंजाबराव वडकुते साहेब कोषागार अधिकारी, आढाव पाटील सेवानिवृत्त पी.एस.आय., साहेबराव बांगर प्रगतशील शेतकरी, विनोद घुले कृषी अधिकारी, केशवराव जांबुतकर सेवानिवृत्त अभियंता, सुनील कुमार जाधवर भुमिअभिलेख जिल्हाअधिक्षक हिंगोली हे उपस्थित होते.

तसेच काशिनाथ दराडेमामा, प्रभाकर रामगिरवार,गजानन धुळधुळे, सेनगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, शेखर यादव पोलीस, प्रकाशराव शिंदे, गजानन पवार, सिकंदर पठाण, रामेश्वर गडदे, रामेश्वर पोले, कोळसा यात्रा कमिटी, रामप्रसाद बेंगाळ सरपंच कोळसा, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे आर.बी., प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सरकटे व्ही.एस., आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बाजगिरे बी.जी., पर्यवेक्षक कसाब पी.पी. हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी वर्षभरातील कार्यक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एकलव्य परीक्षेमध्ये गुणवंत आलेल्या विद्यार्थ्यांचा,क्रीडा क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच शाळेमध्ये “आनंद नगरीचे आयोजन” करण्यात आले होते.

यावेळी आनंद नगरीचा सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी आनंद घेतला.त्यानंतर ‘स्वरविराज म्युझिक ग्रुप’ परभणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुंदर देशभक्तीपर गीत गायनाचे आयोजन पार पडले.तसेच वैष्णवी रामकिसन सोळंके या मुलीचे सुंदर योगा प्रदर्शन शरीराच्या सर्व लवचिक हालचाली करून दाखविल्या यामधून मुला-मुलींना प्रेरणा मिळाली.

तसेच राज्यस्तरीय क्रिकेट या खेळामध्ये प्राविण्य मिळविलेल्या कोमल खंदारे व दिपाली राठोड या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी परिसरातील सर्व पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन शिंदे आर. बी. व आभार काळे बी.के. यांनी केले.

Related posts

हिंगोली रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी 19.50 कोटी; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला नागरिकांशी संवाद

Santosh Awchar

मानव विकासची बस वेळेवर येईना; विद्यार्थिनींना करावी लागते पायपीट! बस फेऱ्या वाढविण्याची मागणी

Santosh Awchar

दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाची प्रतिबंधीत सुगंधीत पान मसाला व तंबाखू वर कार्यवाही

Santosh Awchar

Leave a Comment