मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यात 7 सप्टेंबर रोजी सर्व दूर भिज पाऊस झाला. खरीप पिकांना या पावसाचा फायदा होऊन काही प्रमाणात का असेना पिकांना जीवनदान मिळाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर काही भागात अल्पसा पाऊस झाला. पावसाने दीर्घकाळ दडी दिल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात आली होती.
सदरील पिके पाण्याअभावी कोमेजून जळण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. तसेच तसेच पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसले होते.
सप्टेंबर महिन्यात 4 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी रात्री आणि पहाटे पाच ते साडेपाच वाजेपासून रिमझिम व भिज पावसाला सुरुवात झाली. दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत हिंगोली येथे हा पाऊस सुरू होता तर सेनगाव व इतर ठिकाणी दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता.
झालेल्या या भिज पावसाने काही प्रमाणात का असेना खरीप पिकांना फायदा झाला असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.