मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा या संस्थेस औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी भेट दिली.
विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहुणे देशमुख, संतोष देसाई ,पवार, प्राध्यापक गायकवाड, तूरनर, प्राचार्य अभिषेक बेंगाळ, मुख्याध्यापक शिंदे आर. बी., सरकटे, बाजगिरे ,पर्यवेक्षक कसाब हे उपस्थित होते. यावेळी बेंगाळ साहेब सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार विक्रम काळे यांनी त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी आपल्या मनोगतातून पवित्र पोर्टल बंद, नोकर भरती ,अनुदान टप्पा वाढवण्यात यावा, केंद्रीय आश्रम शाळा यांना 20 टक्के घोषित अद्यापपर्यंत वेतन नाही ,उच्च माध्यमिक विद्यालय 20% घोषित वेतन नाही हे सर्व आमदार विक्रम काळे यांच्या उपस्थितीत मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी विचार मांडले.
यावेळी समारोपामध्ये आमदार विक्रम काळे यांनी कोरोना काळामध्ये शिक्षकांच्या वैद्यकीय सेवेचा प्रश्न मार्गी लावला ,संचमान्यता ,पेन्शन योजना ,पवित्र पोर्टल यासाठी माझा सतत लढा चालू राहील. तुम्हाला योग्य तो न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी सूत्रसंचालन पायघन बि.डी यांनी केले यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.