मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मिरॅकेल फाऊंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित अधिनियम 2021 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथे ग्राम बाल संरक्षण समितीची कामकाज आढावा बैठक घेण्यात आली.
या आढावा बैठकीमध्ये मिरॅकल फांऊंडेशन इंडियाचे सहायक व्यवस्थापक सागर शितोळे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, संस्थाबाह्य बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण, रामप्रसाद मुडे, सरपंच तथा ग्राम बाल
संरक्षण समिती अध्यक्ष स्वाती चट्टे, अंगणवाडी सेविका तथा सदस्य सचिव मिराबाई शिंदे, पोलीस पाटील अनिल वाघमारे, ग्राम बाल संरक्षण समितीतील इतर सदस्य व गावकरी उपस्थित होते.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015, शासन निर्णय दि. 10 जून, 2014 व सुधारित अधिनियम 2021, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, बालकांचे हक्क विषयक कायदा 2005, बाल कामगार प्रतिबंध
कायदा 1986 व शिक्षण हक्क कायदा 2010 इत्यादी कायद्यांची कशा प्रकारे अंमलबजावणी करावी याबाबत सविस्तर माहिती या ग्राम बाल संरक्षण समिती आढावा बैठकीमध्ये देण्यात आली.
या बैठकीत काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके, विधी संघर्षग्रस्त बालके यांच्यासाठी कशाप्रकारे काम करीत आहे याची माहिती घेण्यात आली.