Marmik
Hingoli live

प्रभावी अंमलबजावणीसाठी पूरजळ, अंजनवाडी येथे ग्राम बाल सरंक्षण समितीची बैठक

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम-2000 (2006) च्या कलम 81 फ व महाराष्ट्र बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) सुधारित नियम 2011 च्या कलम 14 च्या (11-2) च्या (ड) नुसार कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे.

त्याच उद्देशाने औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे पुरजळ व अंजनवाडी येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक घेण्यात आली.

या आढावा बैठकीमध्ये ग्राग बाल संरक्षण समितीमध्ये नव्याने 20 ते 30 वयोगटातील युवक-युवतींची बाल मित्र म्हणून निवड करण्यात यावी.

तसेच गावातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांबाबत , विधी संघर्षग्रस्त , बालकामगाराबाबत , गावात बाल विवाह होऊ नये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून बाल कायद्याविषयी गावात जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे केस वर्कर तथागत इंगळे तसेच गावातील सरपंच तथा ग्राम बाल संरक्षण समिती अध्यक्ष, सर्व सदस्य व अंगणवाडी सेविका तथा ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य सचिव इत्यादी उपस्थित होते.

Related posts

राणा श्वानाचे निधन; शोकाकुल वातावरणात पोलिसांकडून निरोप

Santosh Awchar

हिंगोली शहर विद्युत शाखेत संविधान दिन साजरा

Gajanan Jogdand

नवसाला पावणारी नांदुरा येथील आई सटवाई

Gajanan Jogdand

Leave a Comment