Marmik
Hingoli live

बोल्डा ग्रा.पं.च्या अटितटीच्या लढतीत विनकर विजयी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील झालेल्या अटितटीच्या लढतीत सरपंचपदी किसन विनकर विजयी झाले आहेत. कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासह आठ उमेदवार निवडणुक रिंगणात विजयी झाले आहेत.

बोलडा येथील प्रभाग क्र.१ मध्ये सर्व साधारण महिला प्रवर्गातुन रोहिनी प्रकाश भालेराव यांना २७७ मत, विरोध आशाबाई प्रभाकर ढोकणे १४३, ना.मा.प्र.महिला प्रयागबाई नामदेव ढोकणे यांना ३०४, तर विरोध संजाबाई शिवाजी ढोकणे १२१ मते मिळाली. सर्वसाधारण प्रवर्गासाठी दिलीप दादाराव ढोकणे यांना १४३ तर संतोष शेषराव ढोकणे यांना २७७ मते मिळुन विजय झाला आहे.

प्रभाग क्र. २ मध्ये ना.मा.प्र.प्रवर्गासाठी दशरथ सितराम काष्टे १४१ तर विजयी उमेदवार झिंगाजी सखाराम ढोकणे १६१ मते मिळाली. सर्वसाधारण महिलासाठी विजया संतोष ढोकणे १७५ हया विजयी तर विरोधक सारिका दिलीप ढोकणे १२७ मिळाली आहे. प्रभाग क्र.३ साठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी कांता उत्तम खंडागळे १३७ मते तर शोभा किशन खंडागळे यांना १७० मते मिळवुन विजयी झाले.

सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी अविनाश सुबाराव ढोकणे यांना १७५ मते मिळुन विजय झाला तर शेख फारुख शेख बक्सु १३३ मते मिळाली आहेत.

अनुसूचित जाती प्रवर्गातील सरपंच पदाच्या या अटितटीच्या लढतीत रिंगणात उतरलेल्या अशोक फकिरा खंडागळे यांच्या विरोधात किसन वामराव विनकर यांनी लढत दिली असुन ४८१ मते मिळाली असुन ते विजयी झाले आहेत.

Related posts

हिंगोली पंचायत समितीत कागदाचा तुटवडा! नागरिकांना कोरे कागद मिळेनात

Gajanan Jogdand

Hingoli राज्याला केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच मिळाले, हे सरकार लोकांपर्यंत पोहोचले नाही – जयंत पाटील

Gajanan Jogdand

अनुसूया बाल विद्या मंदिर येथे रक्षाबंधन साजरे

Gajanan Jogdand

Leave a Comment