मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – हिंगोली लोकसभा मतदार संघातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. आज एकाच वेळी विनश्री गडगीळे आणि लक्ष्मण राठोड सारखी अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय खेळासाठी निवड होणे हे हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी अभिमानासपद व जिल्ह्याची मान उंचावणारी गोष्ट असल्याचे वक्तव्य खासदार हेमंत पाटील यांनी येथे केले.
वसमत तालुक्यातील विनश्री सुदाम गडगीळे या शेतकरी कन्येची ४ ते १० डिसेंबर दरम्यान चिंचणी बीच बोईसर जिल्हा पालघर येथे होणाऱ्या बीच टग – ऑफ वाॅर (रस्सीखेच) या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तर सेनगाव तालुक्यातील लिंगदरी या छोट्याश्या गावातील लक्ष्मण गोविंद राठोड या युवकाने चंद्रपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकल्यानंतर त्याची जानेवारी 2024 मध्ये पटना (बिहार) येथे होणार्या राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात लिगो प्रकल्प सुरू झाल्यास भविष्यात हजारो विद्यार्थ्यांना आपापल्या आवडीच्या विविध विषयात संशोधन करण्याची गोडी लागेल आणि हा जिल्हा शास्त्रज्ञाचा जिल्हा म्हणून नाव लौकिक मिळवेल यात तीळमात्र शंका नाही. हे खरे परंतू आजच्या घडीला एकाच वेळी जिल्ह्यातील दोन विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे ही भविष्यातील खेळाडूंचा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. हे देखील तितकेच सत्य आहे. असे खासदार हेमंत पाटील म्हणाले.
या दोन्ही गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेला जाण्यापूर्वी खासदार हेमंत पाटील यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व राष्ट्रीय स्पर्धेत विजयी होण्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी सेनगाव तालुकाप्रमुख रामप्रसाद घुगे, उप तालुका प्रमुख नागोराव फसाटे, सर्कल प्रमुख तथा माजी सरपंच विश्वनाथ पवार, ललिता गडगीळे यांची उपस्थित होती.